|| श्री. क्षेत्र मुऱ्हा देवी ||
श्री. जगदंबा देवी व श्री. संत झिंग्राजी महाराज संस्थान मुऱ्हा (देवी)ता. अंजनगाव (सुर्जी), जि. अमरावती.
रजि. क्र. ए/७३०
देवस्थानातील उपक्रम-
१. दोन्ही मंदिरे व देवस्थानच्या इतर इमारती याना जनरेटरने विद्युत पुरवठ्याची सोय केली आहे.
२. लग्न, वाढदिवस, साखरपुडा या सारख्या शुभ कार्य करण्यासाठी, माउली आश्रम येथे भव्य असे मंगल कार्यालय उभारण्यात आले आहे.
३. भक्तांना राहण्यासाठी, भक्तनिवास बांधण्याचे काम प्रगती पथावर चालू आहे.
धार्मिक उपक्रम -
१. धर्मजागरणासाठी भजन, कीर्तन प्रवचनाचे आयोजन.
२. हनुमान जयंतीला गाडपगाड, नवरात्रौत्सव, श्री. संत झिंग्राजी महाराज पुण्यतिथी, तसेच बरेचस्या महोत्त्सवाचे आयोजन संस्था मोठ्या दिमाखदारपणे करते.
३. सर्वांगीण बाल संस्कार शिबिराचे आयोजन.
शैक्षणिक उपक्रम -
१. गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते.
२. कोणत्याही परीक्षेत गुणवत्तेत आलेल्या व कोणत्याही ठिकाणी नोकरीवर लागलेल्या मुलांचा सत्कार संस्थान तर्फे नियमित केला जातो.
वैद्यकिय उपक्रम-
१. रक्तदान शिबीर, आरोग्यशिबीर, योगवर्ग तसेच ताणतणाव कमी करण्यासाठी परिसंवादांचे आयोजनही संस्थेतर्फे केले जाते.