|| श्री. क्षेत्र मुऱ्हा देवी ||
श्री. जगदंबा देवी व श्री. संत झिंग्राजी महाराज संस्थान मुऱ्हा (देवी)ता. अंजनगाव (सुर्जी), जि. अमरावती.
रजि. क्र. ए/७३०
सार्वजनिक विश्वस्त कायदा अस्तित्वात आल्यानंतर सद्यस्थितीत देवस्थानाचा कारभार हा धर्मादाय आयुक्त यांनी मंजूर केलेल्या योजनेप्रमाणे "श्री. जगदंबा देवी व श्री. संत झिंग्राजी महाराज संस्थान " या नावाने संस्था स्थापून दि. १२.०१.१९६३ रोजी ट्रस्ट रजिस्ट्रेशन नं. ए / ७३० अमरावती, नोंदणी केलेली असून देवस्थानचा कारभार विश्वतांच्या देखरेखीखाली चालतो.
१. श्री. जगदंबा देवी व श्री. संत झिंग्राजी महाराज ही दोन्ही मंदिरे पहाटे ५ ते रात्री १०.०० पर्यंत दर्शनासाठी उघडी असतात. रात्री १०.०० नंतर कोणत्याही परिस्थितीत मंदिरे उघडण्यात येत नाहीत.
२. प्रत्येक दिवशी मंदिरात पहाटे सनईवादन, धुपारती, नित्यपूजा, नैवेद्य व रात्री ८ वाजता आरती होते.
३. भाविकांना पहाटे ९.३० ते १०.०० पर्यंत आतील गाभाऱ्यात देवस्थानच्या पुजाऱ्याकडून स्वहस्ते पूजा करता येते.
४. दररोज सकाळी पंचामृती स्नानानंतर पोशाख, नैवेद्य, आरती, मंत्रपुष्प असा कार्यक्रम होतो, देवीच्या स्नानाच्या वेळी गर्भगृह बंद करून आत फक्त स्त्रियाच उपस्थित असतात.
५. देवीच्या मंदिरात प्रत्येक एकादशीला स्थानिक मंडळाचे भजन असते.
६. पूजेचा मान प्रथम महिलांना दिला जातो.
७. श्री. जगदंबा देवी व श्री. संत झिंग्राजी महाराज संस्थे तर्फे गेली अनेक वर्षे अभिषेक योजना राबवली जात आहे. आपण दिलेल्या अभिषेक देणगीतून, पहाटे ९.३० ते १०.०० या वेळेत अभिषेक, सहस्रावर्तने,दुग्धाभिषेक प्रत्यक्ष करत असतात. भाविकांनी नमूद केलेल्या दिवशी त्यांनी सांगितलेले धार्मिक कृत्य करून, त्याचा अंगारा व प्रसाद पाठविला जातो.
८. मंदिरात देणगी, अभिषेक व अन्य पावत्या करण्यासाठी सभा मंडपात छोटे कार्यालय आहे. आप दिलेल्या प्रत्येक गोष्टीची आपणास पावती मिळते. देवस्थानतर्फे करण्यात येणाऱ्या अभिषेकाचे सध्याचे दक्षिणामूल्य पुढीलप्रमाणे आहे.
अभिषेक, दिनविशेष अभिषेक व देणगी online पद्धतीने स्वीकारली जाण्याची तरतूद वेबसाईट केली असून उर्वरित अभिषेक व धार्मिक विधींसाठी मंदिरातील कार्यालयात संपर्क करावा.
अभिषेकः श्री.जगदंबा देवीच्या अभिषेकाने मनोकामना पूर्ण होतात अशी लाखो भक्तांना प्रचीती झा आहे. आपण ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही अभिषेकाची रक्कम देऊ शकता. अभिषेकाची आपली इच्छा आणि पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. अभिषेक पूर्ततेनंतर श्री. जगदंबा देवीच्या चरणांनी पावन झालेला आपला प्रसाद व अंगारा आपल्या पत्त्यावर पाठवण्यात येईल. अभिषेकच्या रक्कमेची किमान मर्यादा ₹२५१/-
दिनविशेष अभिषेकः आपल्या आयुष्यातील महत्वाच्या दिवसाला (उदा, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, आपल्या आप्तजनांचा स्मृतिदिन इत्यादी) श्री. जगदंबा देवीच्या भक्तीची जोड त्या दिवसाला अजूनच तेजोमय झळाळी देईल. त्या अनुषंगाने ही दिनविशेष अभिषेकाची भक्तिमय सुविधा. अभिषेकाची आपली इच्छा आणि पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. अभिषेक पूर्ततेनंतर श्री. जगदंब देवीच्या चरणांनी पावन झालेला आपला प्रसाद व अंगारा आपल्या पत्त्यावर पाठवण्यात येईल. अभिषेकच्या रक्कमेची किमान मर्यादा ₹३०१ /-
अभिषेक - ₹ २५१ /-
दिनविशेष अभिषेक-₹ ३०१/-
देणगी - ऐच्छिक
९. मंदिरात अर्पण केलेल्या सोन्याच्या किंवा चांदीच्या वस्तू पुजारी यांचेकडून परत घेऊन त्या देवस्थान कार्यालयात किंवा सभामंडपातील कार्यालयात घेऊन त्याची रीतसर पावती देण्यात येते.
१०. भाविकांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध.
११. मोफत प्रशस्त पार्किंगची व्यवस्था.
१२. देवस्थानच्या मंदिर परिसरात आर. ओ. फिल्टरसह पिण्याच्या पाण्याचे कूलर बसवलेले आहेत.
१३. भक्तनिवास तसेच मंदिरातील आतील परिसरात स्त्रिया व पुरुषांसाठी स्वच्छता गृहांची सोय आहे.
१४. देवस्थानतर्फे पुजारी, कारकून, शिपाई, सफाईकामगार, सुरक्षारक्षक यांची पगारी नेमणूककरण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही भक्ताने त्यांना पैसे देऊ नयेत ( कोणत्याही स्वरूपात मूल्य देऊ नये).
१५. मंदिरातर्फे कोणतीही व्यक्ती बाहेर गावी वर्गणी साठी पाठवली जात नाही. याची सर्व भक्तांनी नोंद घ्यावी.