|| श्री. क्षेत्र मुऱ्हा देवी ||
श्री. जगदंबा देवी व श्री. संत झिंग्राजी महाराज संस्थान मुऱ्हा (देवी)ता. अंजनगाव (सुर्जी), जि. अमरावती.
रजि. क्र. ए/७३०
मुऱ्हा या गावात जगदंबा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. मुऱ्हा देवी अमरावती जिल्ह्यातील, अंजनगाव तालुक्यातील एक छोटेसे गाव, अमरावती पासून ८० कि. मी. अंतरावर आहे. या मंदिराला ८०० वर्षाचा पौराणिक इतिहास आहे. देवी भक्त असलेल्या झिंग्राजी महाराजांच्या वास्तव्याने या भूमीला अध्यात्माची झळाळी आली आहे. पुरातत्व विभागाचे अभ्यासक डॉ. गाजूल यांनी केलेल्या पाहणीनुसार देवीची मूर्ती ८०० वर्षा पूर्वीची आहे. या मंदिराला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे चार द्वार आहेत. बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तांना पूर्वेकडील द्वारातून प्रवेश करता येतो. मंदिराच्या आतील परिसर नेटका, स्वच्छ व सुंदर आहे. संस्थानच्या जीर्णोद्वारचे काम १९६५ साली पूर्ण करण्यात आले. ६ जून २०१७ रोजी देवीचा कलाकर्षण (वज्रलेपविधी) करण्यात आला. अंजनगाव येथील देवनाथ पिठाचे पीठाधीश आचार्य जितेंद्रनाथ महाराजांच्या मार्गदर्शनात वेद्शात्र संपन्न आर्वीकर शास्त्री यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
तसेच जगदंबा देवी मंदिर परिसरात संत झिंग्राजी महाराजांचे सुबक व रेखीव मंदिर आहे. भुयारात महाराजांची समाधी आहे. वर विठ्ठल-रूक्मिणीचे मंदिर सुद्धा आहे. या परिसरात महाराजांचे भक्तगण मोठ्या प्रमाणात आहेत. श्री. झिंग्राजी महाराज संत श्रेष्ठ गजानन महाराजांचे गुरुबंधू होते. मुऱ्हा येथील पांडे कुळात त्यांचा जन्म झाला होता. बालपणा पासून त्यांच्या लिलांमुळे लोकांना त्यांच्यातील अलौकिकत्वाचा प्रत्यय आला. अचलपूरचे स्वामी तपमाळी यांनी लिहिलेल्या महाराजांच्या चरित्रग्रंथात सविस्तर माहिती आहे. या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन संस्थेमार्फत श्री. संत वासुदेव महाराजांच्या हस्ते करण्यात आले. दासगणू विरचित श्री. गजानन विजय या ग्रंथात सुद्धा श्री. संत झिंग्राजी महाराजांचा उल्लेख आहे. संत गजानन महाराज, भास्कर महाराज व झिंग्राजी महाराज अनेक प्रसंगी मुऱ्हा देवीच्या मंदिरात एकत्र आल्याचा उल्लेख आहे. दरवर्षी पौष शुद्ध नवमीला महाराजांची यात्रा भरते. आठवडाभर धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते. महाराजांच्या भक्तांनी म्हैसपूर, जि. अमरावती तसेच लोहारा व शिरसोली जि. अकोला या ठिकाणी सुद्धा मंदिरे बांधली आहेत.
हा आमचा एक प्रयत्न आहे ज्या मार्फत आम्ही श्री. जगदंबा देवी व श्री. संत झिंग्राजी महाराज संस्थे संबंधीची माहिती सर्व भाविकांपर्यंत पोहचवू इच्छितो. तुम्हास काही सुचवायचे असेल वा तुमची प्रतीक्रिया कळवायची असेल तर कृपया पुढील पत्त्यावर कळवावी shreemurhadevisansthan@gmail.com
श्री. जगदंबा देवी व श्री. संत झिंग्राजी महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांची मनोकामना पूर्ण होवो हि सदिच्छा.
1. श्री. साहेबराव केशवराव पखान - अध्यक्ष
2. श्री. चंद्रशेखर त्र्यंबकराव घोगरे- उपाधक्ष्य
3. श्री. रमेश किसनराव पांडे - सचिव
1. मुंबईहून येण्याचा मार्ग- मुंबई ते मूर्तिजापूर रेल्वे स्थानक पर्यंत तुम्ही ट्रेन ने येऊ शकता, पुढे मुर्तिजापूर ते परतवाडा अशी महाराष्ट्र शासनाची बस सुविधा उपलब्द्ध आहे. मुऱ्हा देवी हे गाव दर्यापूर ते अंजनगाव सुर्जी या रोड वर आहे. मुंबई ते मुऱ्हा देवी हे अंतर ६५० कि.मी. आहे. मुंबई ते मूर्तिजापूर चालणाऱ्या गाड्या :- सेवाग्राम एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, अमरावती सुपर फास्ट, हावडा मेल ह्या गाड्या आहेत. तसेच आपण मुंबई ते मुहा देवी खाजगी वाहनाने सुद्धा इथे पोहचू शकता.
2. पुणेहुन येण्याचा मार्ग- पुणे ते मूर्तिजापूर रेल्वे स्थानक पर्यंत तुम्ही ट्रेन ने येऊ शकता, पुढे मुर्तिजापूर ते परतवाडा अशी महाराष्ट्र शासनाची बस सुविधा उपलब्द्ध आहे. मुऱ्हा देवी हे गाव दर्यापूर ते अंजनगाव सुर्जी या रोड वर आहे. पुणे ते मुऱ्हा देवी हे अंतर ६३३ कि.मी. आहे. पुणे ते मूर्तिजापूर चालणाऱ्या गाड्या :- महाराष्ट्र एक्सप्रेस, पुणे नागपूर एक्सप्रेस, पुणे अमरावती एक्सप्रेस, ह्या गाड्या आहेत. तसेच पुणे ते परतवाडा अशी ट्रॅव्हल्स सुद्धा चालते. जे तुम्हाला अंजनगाव इथे सोडून पुढे निघून जाते. अंजनगाव ते मुऱ्हा देवी साठी ऑटो रिक्षा, बस उपलब्द्ध आहे.
3. नागपूरहून येण्याचा मार्ग - नागपूर ते मूर्तिजापूर रेल्वे स्थानक पर्यंत तुम्ही ट्रेन ने येऊ शकता, पुढे मुर्तिजापूर ते परतवाडा अशी महाराष्ट्र शासनाची बस सुविधा उपलब्द्ध आहे. मुऱ्हा देवी हे गाव दर्यापूर ते अंजनगाव सुर्जी या रोड वर आहे. नागपूर ते मुऱ्हा देवी हे अंतर २३३ कि.मी. आहे. नागपूर ते मूर्तिजापूर चालणाऱ्या गाड्या :-सेवाग्राम एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, अमरावती सुपर फास्ट, हावडा मेल ह्या गाड्या आहेत. तसेच आपण नागपूर ते मुऱ्हा देवी येथे खाजगी वाहनाने सुद्धा पोहचू शकता.